मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातील भांडवली बाजार आठ महिन्यांच्या नीचांक पातळीवर फेर धरू लागले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत ही घसरण कायम राहिली, तर तब्बल २८ वर्षांनी सलग पाच महिने पडझडीचे ठरतील. ‘दलाल स्ट्रिट’च्या इतिहासात २४ वर्षांत असे केवळ दोनदा घडले असून यापूर्वी १९९६ साली अशी झड भांडवली बाजारांनी पाहिली होती.

●सलग पाचव्या सत्रातील घसरणीमुळे ‘सेन्सेक्स’मध्ये १,५४२.४५ अंशांची (२ टक्के) आणि ‘निफ्टी’मध्ये ४०६.१५ अंशांची (१.७६ टक्के) घट नोंदविली गेली आहे.

●सोमवारी ‘सेन्सेक्स’ ८५६.६५ अंश (१.१४ टक्के) घसरणीसह ७४,४५४.४१ पातळीवर तर ‘निफ्टी’ २४२.५५ अंश (१.०६ टक्के) तुटीसह २२,५५३.३५ वर बंद झाला.

●फेब्रुवारीत आतापर्यंत कामकाज झालेल्या १४ सत्रांत निर्देशांकांसाठी केवळ दोनदा वाढ झाली. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी ४ टक्क्यांची घट.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजारांना ‘डोनाल्ड डंख’!अमेरिकेतील सत्तांतर हा भांडवली बाजारांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनसह अन्य देशांवर भरमसाठा कर लावण्यास सुरुवात केल्याने व्यापारयुद्ध भडकरण्याची गुंतवणूकदारांना धास्ती आहे.