मुंबईत लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) आयकर विभागाच्या आयुक्तांसह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने काल रात्री ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आयकर विभागाचे (लवाद) आयुक्त बी.बी. राजेंद्र प्रसाद यांचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या सर्वांनी पैसे घेऊन काही कॉर्पोरेट कंपन्यांवर मेहेरनजर केल्याचा आरोप आहे. याबद्दल सीबीआयला माहिती मिळाल्यानंतर या अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. सीबीआयकडून काल रात्री गुप्तपणे ही कारवाई पार पाडण्यात आली. यावेळी सीबीआयने लाच म्हणून देण्यात आलेली तब्बल दीड कोटी रूपयांची रक्कमही जप्त केली.