ठाणे रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी सकाळी मालगाडी बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.  कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अप जलद मार्गावर मालगाडी बंद पडली. त्यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या पाच गाडय़ा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही दिशांकडील वाहतूक विस्कळीत झाली. लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. दोन तासांच्या या गोंधळामुळे  चाकरमान्यांचे मात्र, चांगलेच हाल झाले.