कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेला रविवारी एका झाडाने हैराण केले. कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर विद्याविहार ते घाटकोपर या स्थानकांच्या दरम्यान एक झाड कोसळले आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या घटनेमुळे ओव्हरहेड वायरही तुटल्याने रेल्वेच्या वाहतुकीला चांगलाच फटका बसला. या दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर वळवण्यात आली. हा गोंधळ तासभर चालला आणि प्रवाशांवर ‘आधीच मेगा ब्लॉक त्यात..’ असे म्हणण्याची वेळ आली.
रविवारचा मेगा ब्लॉकचा दिवस डोक्यात ठेवून मध्य रेल्वेवर आनंदीआनंद असणार, अशा मन:स्थितीतच लोक रविवारी सकाळी घराबाहेर पडले. मात्र मेगा ब्लॉक सुरू होऊन काही मिनिटे उलटतात तोच ११.२५ च्या सुमारास विद्याविहार-घाटकोपर या स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर झाड कोसळले आणि या घटनेत ओव्हरहेड वायर तुटली. तंत्रज्ञांच्या मदतीने दुरुस्ती करण्यासाठी तब्बल एका तासाचा कालावधी
लागला.
या दरम्यान ठाणे-कल्याणकडे जाणाऱ्या सर्व धिम्या गाडय़ा भायखळा स्थानकापासूनच जलद मार्गावर वळवण्यात आल्या. सुदैवाने मुंबईकडे जाणाऱ्या धिम्या मार्गाला या झाडाचा उपसर्ग न पोहोचल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र मेगा ब्लॉकच्या कामांमुळे एकंदरीतच प्रवाशांचे हाल झालेच. कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांना मुलुंडपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास गाडीत काढावे लागत होते. मुलुंडनंतर मात्र गाडी बऱ्यापैकी वेगाने मुंबईकडे धावत
होती.
मेगा ब्लॉक सुरू होऊन काही मिनिटे उलटतात तोच ११.२५ च्या सुमारास विद्याविहार-घाटकोपर या स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर झाड कोसळले आणि या घटनेत ओव्हरहेड वायर तुटली. तंत्रज्ञांच्या मदतीने दुरुस्ती करण्यासाठी तब्बल एका तासाचा कालावधी लागला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2013 रोजी प्रकाशित
मध्य रेल्वेला झाडाचे निमित्त विद्याविहार-घाटकोपरदरम्यान झाड कोसळून वाहतूक विस्कळीत
कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेला रविवारी एका झाडाने हैराण केले. कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर विद्याविहार ते घाटकोपर या स्थानकांच्या दरम्यान एक झाड कोसळले आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या घटनेमुळे ओव्हरहेड वायरही तुटल्याने रेल्वेच्या वाहतुकीला चांगलाच फटका बसला. या दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर वळवण्यात आली. हा गोंधळ तासभर चालला आणि प्रवाशांवर ‘आधीच मेगा ब्लॉक त्यात..’ असे म्हणण्याची वेळ आली.

First published on: 01-07-2013 at 06:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway stops functioning tree falls on track