मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी, परिर्चया आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. पण, मागणी करूनही कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली जात नव्हती. मात्र आता कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेलाही मुदतवाढ देण्यात आली असून सहा दिवसांची मुदतवाढ म्हणजे २७ जुलैपर्यंत मुभा दिली आहे. प्रवेशाची पहिली यादी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा द्वारे प्रवेश प्रक्रिया ४ जुलैपासून सुरू झाली होती. मात्र, या अभ्यासक्रमांशी संबंधित वेळापत्रक हे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून ठरवले जाते. परिषदेकडून सुधारित वेळापत्रक २१ जुलै रोजी जाहीर करण्यात आले. त्यामुळे सीईटी कक्षाकडून अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी अधिक कालावधी मिळणार आहे.
कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या बी.एस्सी अॅाग्रीकल्चर, बी.एस्सी (हॉर्टिकल्चर), बी.एस्सी (फॉरेस्ट्री), बी.एफ.एस्सी (फिशरी), बी.टेक (फूड टेक्नोलॉजी), बी.टेक (बायो टेक्नोलॉजी), बी.टेक (अॅमग्रीकल्चर इंजिनियरिंग), बी.एस्सी कम्युनिटी सायन्स, बी.एस्सी अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट या नऊ शाखांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आतापर्यत राज्यभरातून २५ हजार ६५० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी २१ हजार २५८ विद्यार्थ्यांनी आपला अर्ज अंतिम केला आहे. आता विद्यार्थ्यांना २७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती माहिती सीईटी सेलचे कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली.
सुधारित वेळापत्रक असे असणार ….
- केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे अपलोड : २७ जुलै
- अंतरिम गुणवत्ता यादी : ३१ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- यादीवर हकरत व तक्रार नोंदणी : १ ते ३ ऑगस्ट
- तक्रारींची यादी प्रसिद्ध : ४ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : ५ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- उपलब्ध जागांची माहिती : ५ ऑगस्ट
- पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम : ६ आणि ७ ऑगस्ट
- पहिली प्रवेश यादी : ९ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- रिपोर्टिंगचा कालावधी : १० ते १२ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- दुसर्या फेरीसाठी जागांची माहिती : १३ ऑगस्ट
- दुसर्या फेरीसाठी पसंतीक्रम : १३ व १४ ऑगस्ट
- दुसर्या फेरीची यादी : १६ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- रिपोर्टिंगचा कालावधी : १७ ते १९ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- तिसर्या फेरीची यादी जाहीर : २३ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- रिपोर्टिंगचा कालावधी : २४ ते २६ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- महाविद्यालयात कागदपत्रे व आवश्यक शुल्क भरण्याचा कालावधी : २४ ते २६ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- केद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशिल जाहीर : २७ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा.नंतर)
- महाविद्यालयस्तरावर प्रवेश फेरी : ४ ते ८ सप्टेंबर
- वर्ग सुरु होणार : २९ ऑगस्ट
- प्रवेश प्रक्रिया संपणार : ८ सप्टेंबर