मुंबई : मध्य रेल्वेवरील साईनगर शिर्डी – तिरुपती, एलटीटी- नांदेड एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल करण्यात आला असून अमरावती – तिरुपती एक्स्प्रेसच्या संरचनेत लवकरात बदल करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. गाडी क्रमांक १७४१८ साईनगर शिर्डी – तिरुपती एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १७४१७ तिरुपती – साईनगर शिर्डी एक्स्प्रेसच्या संरचनेत अनुक्रमे २२ आणि २१ मार्चपासून बदल करण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान,  ६ सामान्य द्वितीय श्रेणी, दोन गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक पॅन्ट्रीकार जोडण्यात आली आहे. तसेच २७ मार्चपासून गाडी क्रमांक १२७६६ अमरावती – तिरुपती एक्स्प्रेस आणि २५ मार्चपासून गाडी क्रमांक १२७६५ तिरुपती – अमरावती एक्स्प्रेसमधील संरचनेत बदल करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या गाडीत एक द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान,  ५ सामान्य द्वितीय श्रेणी, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन असतील. तसेच २१ मार्चपासून गाडी क्रमांक ०७४२७ लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस आणि २० मार्चपासून  गाडी क्रमांक ०७४२६ हुजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रसमधील संरचनेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०७४२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ०७४२८ हुजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये संरचनेत बदल होणार असून या गाडीत १२ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, एक पँट्री कार आणि २ जनरेटर कम लगेज ब्रेक व्हॅन असणार आहेत. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी प्रतीक्षायादीतील तिकिटांची स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in express structure on central railway mumbai print news ysh
First published on: 22-03-2023 at 12:29 IST