मुंबईः लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा २०२५ मधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. मात्र, या चित्रपटाच्या १८१८ बेकायदा इंटरनेट लिंक सापडल्या असून याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

‘छावा’ने जगभरात ६०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला जगभरात प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाच्या लिंक बेकायदेशिरित्या इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंच्या तपासणीत १८१८ बेकायदा लिंक इंटरनेटवर आढळल्या आहेत. त्याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३०८ (३) तसेच कॉपीराईट अॅक्ट कलम ५१, ६३, ६५(अ) सिनेमॅटोग्राफी कायदा ६(अ)(अ) व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ४३ व ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

१८१८ बेकायदा लिंक

ऑगस्ट इंटरटेन्मेट प्रा. लि. विशेष कार्यकारी अधिकारी(सीईओ) रजत राहुल हकसर(३७) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या कंपनीला मॅडडॉक फिल्मस प्रा. लि. कंपनीने अॅन्टी पायरसी संस्था म्हणून नियुक्त केले आहे. त्यांनी छावा चित्रपटाच्या बेकायदा वितरणाबाबत तपास केला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या तपासणीत १८१८ बेकायदा इंटरनेट लिंक सापडल्या आहे. त्यामुळे पायरसी कायद्याचा भंग झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आता सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. कंपनीकडून या बेकायदा लिंकची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्यांहून जास्त दिवस झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा हा चित्रपट ३२ दिवसांपासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे. विकी कौशल दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘छावा’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’ (२०२३) आणि रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’चे रेकॉर्ड मोडले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना व औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. कवी कलश हे पात्र विनीत कुमार सिंहने साकारले आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, निलकांती पाटेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्येसह अनेक मराठी कलाकार या चित्रपटात आहेत.