अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप शेतपिकांचे पंचनामे झालेले नाहीत. शासकीय कर्मचारी संपावर असलेल्या हे पंचनामे रखडले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. विधिमंडळ परिसरात टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा –गोळीबार करून दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का?, अजित पवारांचा सरकारला सवाल

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

काय म्हणाले छगन भुजबळ?

“राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. काल मी नांदेड आणि लातूरमध्ये होतो. तिथेही काश्मीरप्रमाणे अर्धाफुटापर्यंत बर्फ साचला होता. राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा वेळी राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे शेतपिकांचे पंचनामे रखडले आहे. काही ठिकाणी पंचनामे झाले, तरी त्यावर सरकारी कर्मचारी सह्या करत नाहीत, शेतकरी संकटात सापडला असताना शिंदे सरकार मात्र, राजकारण करण्यात व्यस्त आहे”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा – “…त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही”; शेतपिकांच्या रखडलेल्या पंचनाम्यांवरून अजित पवारांचा हल्लाबोल!

“मग सर्वसामान्यांचे अश्रू कोण पुसणार?”

“सरकार सर्वसामान्यांचं आहे, असं म्हटलं जातं. मग सर्वसामान्यांचे अश्रू कोण पुसणार? जनतेचे अश्रू पुसायचं सोडून शिंदे सरकार एकमेकांवर आरोप करण्यात व्यक्त आहे. सरकारकडून केवळ राजकारण करण्यात येत असून जनतेकडे दुर्लेक्ष केलं जात आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – संजय गायकवाडांनी शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून अजित पवार संतापले; म्हणाले, “सत्ताधारी पक्षातील आमदारांनी…”

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

दरम्यान, शेतपिकांच्या रखडलेल्या पंचनाम्यांवरून विरोधकांनी आज आक्रमक पावित्रा घेतला. राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच या मुद्द्यावरून विरोधकांनीही सभात्याग केला.