ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी त्यांना पदावरून हटवलं आहे. दरम्यान, या कारवाईनंतर आमदार नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “कसब्यातील ब्राह्मण वर्ग नाराज असल्याचे मानून…”, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल!

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वैभव नाईक यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चेबाबत त्यांना विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, वैभव नाईकांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. मात्र, ते रोज संपर्कात असतात. त्यांची रोज विधानसभेत भेट होते. तसेच नाईकांच्या शिंदे गटातील प्रवेशाची शक्यता आहे का? असे विचारलं असता, सर्वच गोष्टी आता सांगू शकत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – नितीन गडकरींकडून योगी आदित्यनाथांची तुलना थेट भगवान श्रीकृष्णाशी; म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच माझ्या पत्नीने…”

वैभव नाईक यांनीही दिलं स्पष्टीकरण

तत्पूर्वी, शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चेबाबत स्वत: आमदार वैभव नाईक यांनीही स्पष्टीकरण दिलं. “शिंदे गट आणि भाजपात येण्यासाठी अनेकजण दबाव टाकत आहेत. तरीही दबावाला झुगारून कोणत्याही पक्षात जाणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे जिल्हाप्रमुख होतो. नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. मी आता जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काम करत आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी जबाबदारी ही काढून घेतली असेल. त्यामुळे शिवसेना वाढवण्यासाठी जे-जे काम करावे लागेल ते करणार आहे,” असे ते म्हणाले.

हेही वाचा – “…म्हणून भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केला”, वैभव नाईक यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वैभव नाईक यांना पदावरून हटवल्यानंतर संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने नियुक्ती करण्यात आलेले सदस्य पूर्वीचे राणे समर्थक असल्याचं बोललं जात आहे.