काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी प्रश्न विचारली असता ते म्हणाले, “मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश होत आहे, असे मी ऐकतोय. अद्याप मला माहीत नाही. पण ते पक्षप्रवेश करणार असतील तर मी त्यांचे स्वागत करतो.” शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना विविध विषयांवर बोलते केले. रामदास कदम यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

हे वाचा >> मिलिंद देवरांनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; वर्षा गायकवाड म्हणाल्या, “पक्ष नेतृत्व तुमच्याशी…”

आज सकाळी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराला सपत्नीक भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासह शिंदे गटाचे आमदार आणि श्री सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाल्याने काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम केला. ते शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्याप्रमाणे रविवारी (१४ जानेवारी) सकाळी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाबरोबर असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे, अशी पोस्ट मिलिंद देवरा यांनी एक्सवर केली आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये देवरा यांनी म्हटले, “आज मी माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा शेवट करत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांपासूनचे संबंध आहेत. जे आज मी संपवत आहे. इतकी वर्षे मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.”

“अनौरस बापाच्या ताकदीवर…”, संजय राऊत यांची शेलक्या शब्दात एकनाथ शिंदे-अजित पवारांवर टीका

आम्ही पक्ष चोरला नाही, हा बाळासाहेबांचा पक्ष

दरम्यान आज सकाळी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पक्ष चोरल्याचा आरोप केला होता. याबाबत शिंदे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, “हा बाळासाहेबांचा पक्ष आहे, तोच आम्ही पुढे नेत आहोत. सत्तेच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांचा विचार सोडणाऱ्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. आम्ही सध्या मुंबईत डीप क्लिन ड्राईव्ह उपक्रम राबवत आहोत. त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जनता क्लिन स्वीप करून टाकेल, अशी त्यांना धास्ती वाटत आहे. त्यातून ते असले आरोप करत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीकांत शिंदेंना उमेदवारी देणे त्यांचीच गरज होती

श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेतून तिकीट देऊन मोठी चूक झाली, असे उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा दौऱ्यात म्हटले होते. त्यावर आज एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “२०१४ साली पक्षालाच गरज होती. उच्चशिक्षित असलेला तरूण उमेदवार त्यांना हवा होता. श्रीकांत शिंदेच्या रुपाने तेव्हा पक्षाला लोकसभेची एक जागा मिळाली.”