मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ केल्याची घोषणा महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) केली आहे. नवीन दर २२ नोव्हेंबरपासून लागू झाले असून, मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर प्रतिकिलो ७५ रुपयांवरून ७७ रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनधारकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

एमजीएलकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ मुंबईसह आसपासच्या परिसरात लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदीत आणि इतर खर्चात वाढ झाली आहे. या कारणांमुळे सीएनजीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जुलै २०२४ मध्ये सीएनजीचा दर वाढविण्यात आला होता.

हेही वाचा…खराब हवामानामुळे लहान मुले सर्दी, खोकला, तापाने त्रस्त ज्येष्ठांनाही संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सीएनजीच्या दरात किलोमागे १.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सीएनजीचा दर प्रतिकिलो ७५ रुपये किलो झाला. तर आता एमजीएलने घेतलेल्या निर्णयानुसार सीएनजीचा दर प्रतिकिलो ७७ रुपयांवर पोहोचला आहे.