मुंबई : आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्काराने गौरव

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘द स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Commissioner Iqbal Singh Chahal
आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा 'स्पिरिट ऑफ मुंबई' पुरस्काराने गौरव (image – ani/twitter)

मुंबई : साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि श्री षण्मुखानंद फाईन आर्ट व संगीत सभा या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘द स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्काराने शनिवारी मुंबईतील करोना योद्ध्यांना गौरविण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘द स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि श्री षण्मुखानंद फाईन आर्ट व संगीत सभा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सोसायटी व सभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डाॅ. आर. चिदंबरम, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. रंगराज, उपाध्यक्ष एम. व्ही. रामनारायण आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – संजय राऊतांविरोधातील हक्कभंगाचं प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग; खासदारकी जाणार?

हेही वाचा – जपानी पद्धतीच्या ‘कोई फिश पाँड’ची जोड देत पुरातन ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’चे संवर्धन; राणीच्या बागेतील आकर्षणात भर

राज्यपालांच्या हस्ते यावेळी चहल यांच्यासह धारावी येथे सेवा बजावणारे सहायक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. अनिल पाचणेकर, पास्कल सलढाणा व दत्तात्रय सावंत यांना करोना योद्धा पुरस्कार देण्यात आला. करोनाकाळात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या घाटकोपर येथील ‘खाना चाहिए’ व ‘भजन समाज’ या संस्थांनाही राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 23:55 IST
Next Story
जपानी पद्धतीच्या ‘कोई फिश पाँड’ची जोड देत पुरातन ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’चे संवर्धन; राणीच्या बागेतील आकर्षणात भर
Exit mobile version