लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मदत करण्याच्या मोबदल्यात नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा जवानांची संख्या कमी करण्यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्या ‘दूता’मार्फत नक्षलवाद्यांशी बोलणी झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या वृत्ताचा स्पष्ट शब्दांत इन्कार करत काँग्रेसला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची वृत्ते प्रसारीत केली जात असावीत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. तर ‘मतपेढीच्या राजकारणासाठी काँग्रेस सामान्य नागरिक व पोलिसांना ठार मारणाऱ्या नक्षलवाद्यांशी हातमिळवणी कशी करू शकते,’ असा सवाल करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तोफ डागली.
दिग्विजय यांनी आपल्या खास माणसामार्फत नक्षलवाद्यांशी संपर्क साधून लोकसभा निवडणुकीसाठी मदत मागितल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या हाती आलेल्या गोपनीय संभाषणातून उघड झाले आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी प्रसिद्ध केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चंद्रपूर येथे झालेल्या जाहीर सभेत या बातमीचा हवाला देऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला. ‘काँग्रेसचे एक नेते नक्षलवाद्यांशी हातमिळवणी करीत आहेत. त्याचा मोबदला म्हणून या चळवळीचा प्रभाव असलेल्या भागातील सुरक्षा दलांच्या संख्येत कपात करण्याचे दिग्विजय यांनी आपल्या खास माणसामार्फत नक्षलवाद्यांशी संपर्क साधून लोकसभा निवडणुकीसाठी मदत मागितल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या हाती आलेल्या गोपनीय संभाषणातून उघड झाले आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी प्रसिद्ध केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चंद्रपूर येथे झालेल्या जाहीर सभेत या बातमीचा हवाला देऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला. ‘काँग्रेसचे एक नेते नक्षलवाद्यांशी हातमिळवणी करीत आहेत. त्याचा मोबदला म्हणून नक्षल भागातील सुरक्षा दलांच्या संख्येत कपात करण्याचे आश्वासन हा नेता देत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून निवडणूक आयोगाने यात तातडीने लक्ष द्यावे,’ अशी मागणी मोदी यांनी केली. तर मुंबईतही भाजप प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या वृत्ताचा इन्कार केला. ‘कोणत्याही काँग्रेस नेत्यांचे नक्षलवाद्यांशी संधान असेल असे मला तरी वाटत नाही. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला बदनाम करण्याकरिताच अशा प्रकारची वृत्ते प्रसारित केली जात असावीत,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्या वर्षी छत्तीसगडमधील काँग्रेसच्या नेत्यांचे हत्याकांड नक्षलवाद्यांनी घडवून आणले होते. अशा वेळी काँग्रेसचे नेते नक्षलवाद्यांशी कशी काय बोलणी करतील, असा सवालही शिंदे यांनी केला.
संभाषणाचा तपशील
*गुप्तचर यंत्रणांच्या हाती आलेल्या गोपनीय संभाषणाच्या ध्वनीफितींमध्ये नागेश, शिवा, सुरेंद्र, क्रांती, वीरराजू, एचबीएच या नक्षलवाद्यांच्या संभाषणाचा तपशील आहे. यापैकी एल्लण्णा आणि एचबी यांच्यातील संभाषणात काँग्रेसच्या प्रस्तावाचा उल्लेख आहे.
*एल्लण्णा एचबीला सांगतो की, दिग्विजय सिंह हे काँग्रेसचे सरचिटणीस असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ राज्याचे प्रभारी आहेत. त्यांनी आपल्याशी एका दूतामार्फत संपर्क साधला होता. काँग्रेसला राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी निवडून आणायचे असून त्यासाठी त्यांना काँग्रेसचे अधिकाधिक खासदार देशभरातून निवडून आणायचे आहेत. तुम्ही आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिलात तर ते निवडून येतील आणि या बदल्यात आम्ही तुमच्या भागातील सुरक्षासैनिकांची संख्या कमी करू , असे आश्वासन दिग्विजय यांनी दिल्याचे एल्लणा एचबीला सांगतो.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2014 रोजी प्रकाशित
काँग्रेसचा इन्कार, भाजपचा वार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मदत करण्याच्या मोबदल्यात नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा जवानांची संख्या कमी करण्यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्या ‘दूता’मार्फत नक्षलवाद्यांशी बोलणी झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

First published on: 05-04-2014 at 04:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress deny nexus with naxal sa bjp attacks