मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दक्षिण मुंबईत निदर्शने करण्यात आली. मुंबईऐवजी अहमदाबादला जागतिक मुक्त आर्थिक केंद्राचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार पावले टाकत असल्याच्या निषेधार्थ कूपरेज मैदानाजवळ ही निदर्शने झाली.
रिझव्र्ह बँकेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. त्या ठिकाणी निदर्शने करण्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरविले होते; पण पोलिसांनी त्यांना रोखले व निरुपम यांना ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक मुक्त व्यापार केंद्राचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने पावले टाकण्याची मागणी करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2015 रोजी प्रकाशित
मोदींविरोधात निरुपम यांची निदर्शने
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दक्षिण मुंबईत निदर्शने करण्यात आली.
First published on: 03-04-2015 at 03:17 IST
TOPICSसंजय निरुपम
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sanjay nirupam held for anti modi protests in mumbai