मुंबई : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईविरोधात शनिवारी दुपारी ३ वाजता मुंबई युथ काँग्रेसने मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. मात्र ईडीच्या कार्यालयाला शनिवारी सुटी असल्याने तेथे कोणीच नव्हते. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भाजप सरकारविरोधात उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर ईडीमार्फत कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी देशभरात आंदोलन पुकारले हाेते. मुंबईमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजता मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. ईडीच्या कार्यालयाला शनिवारी सुटी होती. त्यामुळे कार्यालयात कोणीच नव्हते. तसेच कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते. मात्र काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याने ईडी कार्यालयाबाहेर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांने प्रवेशद्वाराला साखळीने अतिरिक्त टाळे लावले हाेते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी ३ वाजता ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.