शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज ( १३ जून ) पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने मदत देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच. लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हेही वाचा : ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
मंत्रिमंडळात कोणते निर्णय घेण्यात आले?
- सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता.
- कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये.
- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.
- पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ.
- लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.
- पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.
- अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.
- मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना.
- स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ.
- चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.