लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर झाला करोना; मुंबईतील डॉक्टर तीन वेळा पॉझिटिव्ह

मुलुंडमधील एक २६ वर्षीय डॉक्टर जून २०२० पासून तीनवेळा करोना पॉझिटिव्ह आढळली आहे

Corona after taking both doses of the vaccine Mumbai doctor three times positive
हा गोंधळात टाकणारा प्रकार असल्याचं डॉ. सृष्टी हलारी सांगतात

मुलुंडमधील एक २६ वर्षीय डॉक्टर जून २०२० पासून तीनवेळा करोना पॉझिटिव्ह आढळली आहे. चिंतेची बाब म्हणजे यावर्षी करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर डॉक्टर दोनदा करोना पॉझिटिव्ह आढळली. आतापर्यंत तीन वेळा पॉझिटिव्ह आढळलेल्या डॉ सृष्टि हलारी म्हणाल्या वारंवार रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यामुळे त्या भ्रमित झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली.

मुंबईमधील संसर्गासंदर्भात जिनोम सिक्वेन्सिंग (करोना विषाणूच्या रचनेमधील बदल आणि जडणघडण) अभ्यास करण्याच्या उद्देशाने सध्या वेगवेगळ्या भागांमधील नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून डॉक्टर सृष्टी यांचा स्वॅबही घेण्यात आला आहे. अशाप्रकारे पुन्हा पुन्हा संसर्ग होणं हा खरं तर गोंधळात टाकणारा प्रकार असल्याचं डॉ. सृष्टी हलारी सांगतात.

हेही वाचा- करोनाचा वेग मंदावतोय?; चार महिन्यानंतर पहिल्यांदाच सापडले इतके कमी करोनारुग्ण

लसीकरणानंतरही डॉ सृष्टि यांना करोना संसर्ग कसा झाला, याची तपासणी करण्यासाठी स्वॅब गोळा करण्यात आला आहे, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये बीएमसीने आणि खासगी रुग्णालयात सॅंपल देण्यात आले आहेत. संसर्गाचे कारण शोधण्यात येत आहे. बीएमसी कोविड सेंटरमध्ये कार्यरत असताना डॉ. हलारी १७ जून २०२० रोजी पॉझिटिव्ह आढळल्या. त्यानंतर यावर्षी २९ मे आणि ११ जुलै रोजी त्यांना संसर्ग झाला.

डॉ. सृष्टीवर उपचार करत असलेले डॉक्टर मेहुल ठक्कर म्हणाले, ‘मे महिन्यात झालेला दुसरा संसर्ग जुलैमध्ये पुन्हा सक्रिय झाला असावा. तसेच एफएमआरचे संचालक डॉ. नर्गिस मिस्त्री म्हणाले की, कदाचित करोनाचा नवीन प्रकार समोर येत असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona after taking both doses of the vaccine mumbai doctor three times positive srk