देशातील सर्वात उंच एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे (ATP) नागरी उड्डाण मंत्री अजित सिंग आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. जमीनीपासून आकाशाकडे झेपावताना आपला विस्तार वाढवत नेणारी, अशी या टॉवरची इमारत मुंबईतली अनोखी इमारत मानली जाते आहे.
अवघ्या मुंबईचे मनोहारी दर्शन घडवणाऱ्या या इमारतीतून कंट्रोलिंगचं काम सुरू होण्याआधीच तिला अनेक सन्मानांनी गौरविले गेले आहे. सध्या ८३.८ मीटर असलेला हा भारतातील सर्वात उंच टॉवर आहे. पण, दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमातळाचे काम पूर्ण झाल्यावर सर्वात मोठा टॉवर असणार आहे. याची उंची १०२ मी. इतकी असणार आहे.