अभिनेता सलमान खान याचा वाहन परवाना न्यायालयात दाखविण्याची सरकारी पक्षाची मागणी मंगळवारी न्यायालयाने फेटाळली. सलमान खान याने त्याचा पहिला वाहन परवाना २००४ मध्ये मिळवला. त्यापूर्वी त्याच्याकडे हा परवाना नव्हता, अशी साक्ष अंधेरी येथील आरटीओ अधिकाऱ्याने गेल्या महिन्यात न्यायालयात दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारी वकिलांकडून करण्यात आलेली मागणी न्यायालयाने फेटाळली.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस, तर चौघांच्या दुखापतीस जबाबदार असल्याच्या आरोपाप्रकरणी सलमानवर सध्या सत्र न्यायालयात नव्याने खटला चालविण्यात येत आहे. २००२ सालच्या या अपघाताशी संबंधित खटल्यात अंधेरी येथील आरटीओ अधिकाऱ्याची साक्ष नोंदविण्यात आली आहे. अपघाताच्या वेळेस सलमानकडे वाहन परवाना होता की नाही हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने सरकारी पक्षाने या आरटीओ अधिकाऱ्याला साक्षीसाठी पाचारण केले होते. आरटीओ कार्यालयातील नोंदीनुसार सलमानला १७ ऑगस्ट २००४ रोजी वाहन परवाना देण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2015 रोजी प्रकाशित
सलमानचा वाहन परवाना मागविण्याची मागणी कोर्टाने फेटाळली
अभिनेता सलमान खान याचा वाहन परवाना न्यायालयात दाखविण्याची सरकारी पक्षाची मागणी मंगळवारी न्यायालयाने फेटाळली.
First published on: 03-03-2015 at 01:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court rejects prosecution plea asking actor salman khan to produce driving licence