Crime News दोन अल्पवयीन मुलींवर मागच्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या त्यांच्या बापाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हा ३५ वर्षीय नराधम बाप कांदिवली भागात राहतो. त्याला आम्ही न्यायालयात हजर करु. त्याला या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर न्यायालय कमीत कमी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देईल असं पोलीस सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं आहे. वडील आणि मुलगी हे नातं अतिशय पवित्र मानलं जातं. अशा नात्याला बट्टा लावण्याचं काम या बापाने केलं आहे. ८ वर्षीय मुलीवर आणि १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी सांगितल्यानुसार, ज्याला अटक करण्यात आली आहे तो नराधम त्याच्या ३० वर्षीय पत्नीसह आणि दोन मुलींसह कांदिवलीत राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलींची आई कामाच्या निमित्ताने बाहेर गेली की आरोपी त्याच्या घराचं दार लावून घ्यायचा आणि दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करायचा. मागच्या सहा महिन्यांपासून म्हणजेच नोव्हेंबर २०२४ पासून तो हे घृणास्पद आणि वडील मुलींच्या नात्याला काळीमा फासणारं कृत्य करत होता. याबाबत आईला काही सांगाल तर तिलाच मारुन टाकेन अशी धमकी त्याने या दोन मुलींना दिली होती. एक मुलगी ८ वर्षांची तर दुसरी १० वर्षांची आहे. त्या मुली सहा महिने शांत होत्या. मात्र शेवटी हे अत्याचार सहन न झाल्याने त्यांनी याबाबत त्यांच्या आईला सांगितलं. आईने तातडीने पोलिसात तक्रार केली. ज्यानंतर या नराधम बापाला मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली.

आरोपीवर कुठल्या कलमांन्वये गुन्हा?

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करुन त्यांचं शोषण करणाऱ्या या नराधमाला पोलिसांनी तातडीने अटक केली. त्याच्यावर कलम ६५ (बलात्कार), कलम ६५ (२) (१२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार), कलम १२६(मुलींशी चुकीचं वर्तन), कलम ३५१ (अत्याचाराचा गुन्हा), कलम ७४ (स्त्रियांच्या सन्मानाचा भंग), कलम ७५ (लैंगिक अत्याचार) अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे POCSO कायद्याच्या अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीला तातडीने करण्यात आलीअटक

आम्ही आरोपीला तातडीने अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. तसंच आम्ही मॅजिस्ट्रेट समोर दोन अल्पवयीन मुलींचा जबाबही नोंदवला आहे असं समता नगर पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेला आहे.