पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम रेल्वे स्थानकात चालत्या लोकलमधील प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्यास मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन बारा तासात अटक केली. गुन्हेगार अभिलेखावरील सराईत आहे. तक्रारदार शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माहीम रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वरून बोरिवलीकडे जाणाऱ्या धिम्या लोकलमध्ये चढले.

हेही वाचा : शिंदे-फडणवीसांची प्रभादेवीमधील शिंदे गट- शिवसेना वादावर चर्चा? ‘वर्षा’वर रात्री उशिरा पार पडली मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकलमध्ये दरवाज्याच्या जवळ उभे राहून मोबाइलवर बोलत असताना, लोकल सुरू होताच फलाटावरील चोराने त्यांच्या हातातील मोबाइल खेचून पळ काढला. तक्रारदाराने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध सुरु केला. सीसीटीव्ही चित्रीकरण आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी सापळा रचून माहीम येथे राहणाऱ्या नूर इस्लाम शेख (२३) याला शनिवारी रात्री एक वाजता अटक केली. त्याच्याकडून ११ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाइल ताब्यात घेतला आहे.