विलीनीकरणाचा निर्णय अद्याप नाहीच

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच अन्य अधिकारीही उपस्थित होते. शिष्टमंडळाने विलीनीकरणाचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला.

एसटी संपातील तीन हजार कर्मचारी परतले

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत शनिवारी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांची एसटी कामगारांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यात विलीनीकरणाचा निर्णय होऊ शकला नाही.

नेमलेल्या समितीच्या शिफारशीनंतरच निर्णय घेऊ असे बैठकीत महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. समिती बारा आठवड्यात निर्णय देणार असून हा कालावधी कमी करण्याच्या शिष्टमंडळाच्या मागणीनंतर अहवालही लवकरच देण्याबाबत सांगितले जाईल, असेही महामंडळाने सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीचाही अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे. दरम्यान, शनिवारी देखील संपावरील अनेक कर्मचारी कामावर परतले. आतापर्यंत ३ हजार १६६ कर्मचारी पुन्हा रुजू झाल्याची माहिती महामंडळाने दिली.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर,  सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांची भेट घेतली. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच अन्य अधिकारीही उपस्थित होते. शिष्टमंडळाने विलीनीकरणाचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. एसटी महामंडळ शासनामध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. ही समिती बारा आठवड्यात शासनाला अहवाल देणार आहे.  समितीने विलीनीकरणाची शिफारस केल्यास ती आम्हाला मान्य असेल, असे सांगत अहवाल लवकर देण्यासाठी समितीला सांगण्यात  येईल, असेही परब यांनी  शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी परब म्हणाले, कामगार संघटनांच्या मागण्यांनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के  महागाई भत्ता व घरभाडे भत्ता वाढवून दिला आहे. फक्त वेतनवाढीसंदर्भात दिवाळीनंतर चर्चा करू असे सांगितले होते.  संपामुळे एसटी अडचणीत आली आहे. एसटीची सेवा तोट्यामध्ये चालवण्याची महामंडळाची इच्छा नाही. उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबित आहोत, असेही त्यांनी सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचेही आवाहन के ले.

कर्मचाऱ्यांना तात्काळ हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

ठाणे : संपात सहभागी असलेल्या ठाणे जिल्ह्यातील एसटी कामगारांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश शनिवारी ठाणे कामगार न्यायालयाने दिले.

बससेवा सुरू… शनिवारीही राज्यात ७१ बसगाड्या धावल्या आणि १ हजार ९३८ प्रवाशांनी प्रवास के ला. सर्वाधिक दादर ते पुणे रेल्वे स्थानक अशा ११ शिवनेरी बस सोडण्यात आल्या. तर नाशिक ते पुणे आठ शिवशाही, पुणे रेल्वे स्थानक ते दादर बारा शिवनेरी, औरंगाबाद ते पुणे नऊ शिवशाही, धुळे ते नाशिक पाच शिवशाहीसह अन्य मार्गावरही वातानुकू लित व साध्या बस सोडल्या.

वेतनवाढीवर चर्चा…

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन दिले, तर कर्मचाऱ्यांच्या आताच्या वेतनाच्या दीडपट वेतन होऊ शकते, यावरही चर्चा झाली. सध्या एसटीत नवीन चालकाला १५ हजार रुपये वेतन मिळत असल्यास वाढीनंतर ते २३ हजार ५०० इतके होईल, असे सूत्रांनी सांगितले.

तीन हजार कर्मचारी रुजू…

गेल्या दोन दिवसांपासून एसटीचे कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. सध्या कर्मचाऱ्यांची संख्या ९२ हजार २६६ असून ३ हजार १६६ कर्मचारी कामावर परतले आहेत. तर ८६ हजार ५८६ कर्मचारी संपात  आहेत. शनिवारपर्यंत पुणे विभागातील ३२५ कर्मचारी पुन्हा कामावर परतले.

संप मागे नाही…एसटी महामंडळाने कामगारांच्या शिष्टमंडळाशी शनिवारी चर्चा के ली. यानंतर महामंडळाने मांडलेल्या प्रस्तावावर कामगारांशीही चर्चा करण्यात येईल, असे शिष्टमंडळाने स्पष्ट के ले. सध्या तरी संप मागे घेण्यात आलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Decision to merge has not yet been made three thousand employees in st state government akp

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या