दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना परवानगीविना ‘रोड शो’ काढल्याच्या आरोपाप्रकरणी शनिवारी कुर्ला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. कुर्ला न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहण्याबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘आम आदमी पक्षा’तर्फे मानखुर्द येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत केजरीवाल सहभागी झाले होते. परंतु आवश्यक ती परवानगी न घेताच ही यात्रा काढण्यात आल्याने वाहतूक पोलिसांनी ही यात्रा अध्र्यावरच बंद पाडली होती व केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.