गियाना देशाच्या स्टॅम्पवर रंगपंचमी खेळत असलेल्या श्रीकृष्णाचे चित्र, इंडोनेशियातील नोटेवरील गणपती, भारतातील पोर्तुगीज, फ्रेंच व ब्रिटिश राजवटीतील दुर्मीळ नोटा तसेच शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील नाणी यांसह आंतरराष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे असलेल्या नोटा व नाणी एकत्रित पाहण्याची संधी मुंबईकरांना टीजेएसबी बँकेने उपलब्ध करून दिली आहे. मनी ऑलिम्पिक या संस्थेचे मालक संजय जोशी व टीजेएसबी बँक बालदिनाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर २०१५ ला १९३ देशांतील चलनी नोटांचे प्रदर्शन दहिसर पूर्व, अशोकवन येथे आपल्या शाखेत आयोजित करीत आहेत. झिम्बाब्वेची गिनीज बुकात नोंद झालेली १०० ट्रिलियन डॉलरची नोट, भारतातून १९७८ मध्ये चलनातून रद्द झालेली एक हजार रुपयाची नोट, विविध देशांच्या विविध रंग, आकार आणि विविध मूल्यांच्या नोटा, नाणी या प्रदर्शनात पाहता येतील.
टीजेएसबी बँक, शॉप नं. १, सद्गुरू हाईट्स क, शिव वल्लभ मार्ग, दहिसर पूर्व, मुंबई- ४०००६८ येथे सकाळी १० ते सायं. ४.०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.