मुंबई : लहान मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाला फास्टफूड कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांसाठी तृणधान्यापासून सुपरफूड बनविण्याचा निर्धार केला आहे. सुपरफूडच्या माध्यमातून मुलांना एक उत्तम पर्याय उपलब्ध होईल, असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जागतिक बाल लठ्ठपणा दिनानिमित्त जनरेशन एक्सएल ओबेसिटी फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संजय बोरुडे यांनी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी जनरेशन एक्सएल ओबेसिटी फाऊंडेशनच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रात कमी वजनाची, कुपोषित बालके, तसेच शहरी जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे, अशा दोन टोकाच्या गोष्टी पाहायला मिळतात. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत गर्भवती महिला आणि जन्माला येणारी बालके यांची काळजी घेण्याबरोबरच मुलाच्या पौगंडावस्थेवरही लक्ष दिले आहे. राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलांना निरोगी राहण्यास मदत केली आहे. मुलांचा लठ्ठपणा ही एक समस्या आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेतील किमान दोन शिक्षकांना यादृष्टीने प्रशिक्षित करावे, मुलांचा लठ्ठपणा, पोषण आणि इतर योजनांबाबत सखोल माहिती असलेली मंडळी अशा मुलांना ओळखण्यास सक्षम असावी आणि त्यांनी अशा मुलांच्या पालकांचे समुपदेशन करावे. हा उपक्रम संपूर्ण भारतातील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. शाळांनी मुलांसाठी पीटीचा तास सक्तीचा करावा. क्रीडांगण नसलेल्या शाळांना परवानगी देऊ नये, तसेच क्रीडा उपक्रमही अभ्यासक्रमाचाच भाग बनवण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

appasaheb jagdale
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या ! आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आमदार दत्तात्रय भरणेंना पाठिंबा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
What Devendra Fadnavis Said About Brahmin Cast
Devendra Fadnavis : ‘ब्राह्मण असणं राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय का?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जात…”
BJP office bearers in Maval asserted their position to campaign for Bapu Bhegde of NCP Ajit Pawar party Pune news
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!
Raju Patil criticizes Eknath Shinde and his son Shrikant Shinde
जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे पिता पुत्रांवर घणाघात
Amruta Fadnavis on ladki Bahin Yojana
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांची पोस्ट चर्चेत! “माझी लाडकी बहीण ही फक्त योजना नसून, आपल्या बहिणींच्या…”
Chief Minister Eknath Shinde started campaigning for assembly elections in Mumbai print politics news
मुंबई झोपडीमुक्त करणार- मुख्यमंत्री
Ratan Tata Successful businessman with social consciousness
रतन टाटा : सामाजिक जाणीव राखणारा यशस्वी उद्योगपती

हेही वाचा : मुंबईवर पाणी कपातीचे संकट, सातही धरणांतील साठा १० टक्क्यांवर; प्रशासनाकडून पुन्हा आढावा

जागतिक लठ्ठपणा अॅटलसच्या मते २०३५ पर्यंत ५१ टक्के नागरिक लठ्ठपणाने ग्रासलेले असतील. तर, ८७ टक्के डॉक्टरांना बालपणातील लठ्ठपणावर उपचारांविषयी माहिती नसल्याची गंभीर आकडेवारी समोर आली आहे. लठ्ठपणा हा प्राणघातक, परंतु टाळता येण्याजोगा आजार आहे. मुलांना संतुलित आहार देणे, दररोज व्यायाम आणि औषधोपचाराकरिता प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे जनरल एक्सएल ओबेसिटी फाउंडेशनचे डॉ. संजय बोरुडे यांनी सांगितले.

हेही वाचा : शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजीचे बंधन शिथिल?

गुबगुबीत असणे म्हणजे लठ्ठपणा – राज

पालकांना त्यांच्या मुलांना निरोगी आणि गुबगुबीत ठेवायला आवडते. परंतु गुबगुबीत असणे म्हणजे लठ्ठपणा. पालकांना लठ्ठपणासारख्या आजाराबाबत शिक्षित करणे आणि जनजागृती करणे ही डॉक्टरांची जबाबदारी आहे. शाळांच्या उपाहारगृहात मुले जंकफूड खातात. ही बाब लक्षात घेऊन शाळांमध्ये मुलांना पौष्टिक आहार कसा मिळेल याकडे लक्ष द्यायला हवे. नागरिक घरी बनवलेले अन्न खातात, तेव्हा ते निरोगी राहतात, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली.