मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांवर अवाजवी प्रभाव ठेवल्याचे पुरावे आहेत, असे मत विशेष न्यायालयाने गुरुवारी देशमुख यांच्या जामीन याचिकेवरील तपशीलवार आदेशात नमूद केले. मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांना जामीन नाकारताना विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी त्यांच्या आदेशात ही बाब नमूद केली. देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोव्हेंबर २०२१ मध्ये मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली होती. त्यांचा जामीन अर्ज १४ मार्च रोजी फेटाळण्यात आला होता.

बदल्या आणि नियुक्तयासंबंधी पोलिस अधिकाऱ्यांची अनधिकृत यादी देशमुख यांच्या सांगण्यावरून तयार केली जायची. ती पोलीस आस्थापना मंडळाकडे पाठवली जायची. मंडळाने तयार केलेल्या अंतिम यादीत देशमुखांकडून प्राप्त शिफारशी समाविष्ट केल्या जात होत्या. प्रथमदर्शनी देशमुख मनी लाँड्रिंगच्या कामात सहभागी असल्याचे दर्शवणारे पुरावे आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Rohit pawar on Tanaji Sawant
“भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता नांग्या…”, अधिकाऱ्याच्या पत्रावरून रोहित पवारांची शिंदेंच्या मंत्र्यांवर टीका
Case against BJP farmer MLA Rajendra Shilimkar Mahesh Bav pune
भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश बावळे यांच्याविरुद्ध गुन्हा… ‘हे’ आहे कारण
BJP silence on Mayawati sparks discussion
मायावतींवर भाजपाचे मौन, भाच्याला अचानक पदावरून दूर केल्यानंतर ‘बी टीम’च्या चर्चेला उधाण
Congress, Bhushan Patil, campaign,
काँग्रेसचे भूषण पाटील यांच्या दिमतीला आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांची फौज
DCM Ajit Pawar
आईवरून टीका झाल्यानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबल्या…”
Chief Minister Eknath Shindes taunts to Naresh Mhaske attempt to comfort BJP leaders
मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
SM Mushrif Who killed Karkare
‘करकरेंच्या शरीरात नेमक्या कुणाच्या गोळ्या?’ Who Killed Karkare पुस्तकाचे लेखक एसएम मुश्रीफ म्हणाले…
uddhav devendra Fadnavis
“मी नागपुरी आहे, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

चांदीवाल आयोगाची सुनावणी पूर्ण

शंभर कोटी वसुलीप्रकरणी राज्य शासनाने नेमलेल्या चांदीवाल आयोगाची चौकशी पूर्ण झाली आहे. यानंतर आता हा चौकशी अहवाल राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. राज्य सरकार यावरून काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. गुरुवारी याप्रकरणी अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर आज हजर झाले होते. आता आयोग आपला निर्णय सीलबंद लिफाफ्यात महाराष्ट्र सरकारला सुपूर्द करणार आहे.