लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईसह उपनगरांत पुढील चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Citizens and systems are once again fooled by the Met department false rain warnings Mumbai
अंदाजांना पुन्हा हुलकावणी; हवामान विभागाच्या इशाऱ्यांमुळे नागरिक, यंत्रणांची फसगत
Mumbai rain alert marathi news
Mumbai Rain Alert: पुढील काही तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
Mumbai Heavy Rainfall Alert Today in Marathi
Mumbai Heavy Rain Alert : मुंबईत पुढील तीन चार तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज
imd prediction on heavy rain failed again mumbai print news zws 70
अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुन्हा चुकला; बुधवारपासून शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा नवा अंदाज
heavy rain in umbai create waterlogging troubles
मुंबई शहर, उपनगरांत संततधार; आज मुसळधार तर उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज
Heavy rain, forecast, Mumbai,
मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज
Mumbai has recorded over 300 mm rainfall in six hours
मुंबईत सहा तासांत ३०० मिमी पावसाची नोंद, ‘कोसळधारां’मुळे मायानगरीचा वेग मंदावला
Heavy rain forecast in Mumbai on Friday
मुंबईत शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज

काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव होऊन मुंबईकर हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे अंगाची लाही होत आहे. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत ढगाळ वातावरण होते. काही भागात पहाटे पावसाचा शिडकावा देखील झाला. तसेच सायंकाळी वातावरणात गारवा जाणवत होता.

आणखी वाचा-मुंबई : एम पूर्व व एम पश्चिम विभागात २९ मे रोजी पाणीपुरवठा बंद

दरम्यान, पुढील तीन-चार दिवस ढगाळ वातावरण राहील तसेच हलका पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाच्या कुलाबा केंद्रात ३३.८ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आर्द्रता ७० टक्क्यांहून असली तरी मागील काही दिवसांपेक्षा मुंबईकरांना या दोन दिवसांत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या पश्चिमेकडून वारे वाहणार आहेत. यामुळे मुंबईत हलक्या पावसाची शक्यता आहे.