राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शक्य त्या सर्व मुद्द्यांवरून दोन्ही बाजू एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपाच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या उद्धव ठाकरे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली. तसेच, आशिष शेलार यांना मुंबई महापालिकेचा २०-२० सामना जिंकायचा असल्याचं म्हणत भाजपासाठी मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल देखील त्यांनी फुंकलं.

दहीहंडी उत्सवावरून टोला!

यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडून काम करत नसल्याची टीका भाजपाकडून केली जात होती. त्याचा संदर्भ घेत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती दिसून आली. पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सगळ्यांनी बघितलं. काल दहिहंडी जोरात होती. आता गणपती, नवरात्र असे सर्व उत्सव जोरात करायचे आहेत. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!

“मुंबई पालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा”

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी येत्या काळात मुंबई महानगर पालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा असेल, असा निर्धार व्यक्त केला. “मागील काळात आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष असताना आपण पालिकेत मोठी मजल मारली. तेव्हाही आपण महापौर बनवून शकलो असतो. आपली पूर्ण तयारी झाली होती. पण आपल्या मित्रपक्षासाठी आपण दोन पाऊल मागे आलो. पण आता मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजपा युतीचाच महापौर बसेल. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि भाजपा मिळून या निवडणुकीत आपला भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.

आशिष शेलार आणि क्रिकेट…फडणवीसांची टोलेबाजी!

दरम्यान, यावेळी आशिष शेलार यांच्याकडे असणाऱ्या विविध प्रकारच्या क्रीडा संघटनांच्या पदभारावरूनदेखील देवेंद्र फडणवीसांनी टोलेबाजी केली. “आशिषजी, तुम्ही क्रिकेट खेळणारेही आहात आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही राहिला आहात. त्यामुळे ट्वेंटी-ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची हे तुम्हाला माहिती आहे. हा सामना तर तुम्ही जिंकणारच आहात. पण महापालिकेत मुंबई विकास लीग आपल्याला सुरू करायची आहे. मध्येमध्ये अडचणी येतात. तुम्ही फुटबॉलची अनेक मैदानं तयार केली आहेत. त्यामुळे मध्ये एखादा फुटबॉल आला, तर त्याला किक कशी मारायची, हे तुम्हाला माहिती आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू”, आशिष शेलारांची भाजपाच्या मेळाव्यात डायलॉगबाजी!

“अनेक उड्या मारणारे लोक आहेत. पण तुम्ही दोरी असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात. त्यामुळे कुणाला किती उडू द्यायचं आणि कुठे दोरी खेचायची, याचीही कल्पना तुम्हाला आहे. त्यामुळे आता मला विश्वास आहे की गेल्या वेळी तुम्ही दो स्ट्राईकरेट दाखवला, तो दुपटीहून अधिक होता. आपण थेट ३५ वरून ८२वर होतो. आता गेल्यावेळचा रेकॉर्ड आपण मोडला पाहिजे. यावर आपली सगळ्यांची नजर आहे”, असं फडणवीस म्हणाले.