लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घरबांधणी क्षेत्राशी संबंधित परिषदेत (रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. मुंबईत पहिली मेट्रो येण्यासाठी ११ वर्षे गेली. पण आम्ही मेट्रो आणताना डिझाईन ते टेंडर या कालावधीसाठी ११ महिनेच घेतले त्यामुळे वेगाने प्रकल्प आणू शकलो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

उपनगरीय रेल्वेबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे आपली लाइफलाईन आहे. या रेल्वेसाठी १०० टक्के एसी डबे आम्ही तयार करत आहोत. स्वयंचलित दरवाजांसह आम्ही ही रेल्वे आणत आहोत. आम्ही जेव्हा म्हटलं होतं की स्वयंचलित दरवाजे तयार करु तेव्हा काही जण म्हणाले की लोक आत कसे जातील? गर्दी होईल, मेट्रोत जात आहेतच. मेट्रो वनला अनेक वर्षे झाली. तिथे शिस्तीतच सगळे जातात. मी तुम्हाला सांगू इच्छितो मुंबईकर शिस्तप्रिय आहे. देशात मुंबई इतकी शिस्त कुणामधेच नाही. दिल्लीत अपरिहार्य नाही का? दिल्लीत न ठोकलेली गाडी दाखवा, मुंबईत कुणी लेनही तोडत नाही. मुंबईकर शिस्त पाळणारे लोक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज लोकसत्ताच्या रिअल इस्टेट कॉनक्लेव्हमध्ये उपस्थिती होती. या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विचारलेल्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरं दिली.

एकात्मिक प्रवासाची सुरुवात आम्ही केली आहे-फडणवीस

मुंबईत खऱ्या अर्थाने एकात्मिक प्रवासाची संकल्पना सुरु होते आहे. ज्या आज गोष्टी आम्ही सुरु केल्या आहेत. २०२९ च्या निवडणुकीच्या आधी पूर्ण झालेले असतील. २०१४ आणि २०१५ मध्ये मी विधानसभेत मेट्रो, कोस्टल रोड या प्रकल्पांबाबत बोलायचो तेव्हा मला हाऊसमध्ये वेड्यात काढायचे लोक पण आम्ही प्रकल्प करुन दाखवले, यापुढेही करुन दाखवू. मुंबईत १७ ते १८ एजन्सीज आहेत त्यांचं सूसुत्रीकरण केलं पाहिजे असं नाही वाटत का? यावरही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

मुंबईत पहिली मेट्रो यायला ११ वर्षे गेली.. पण आम्ही

मुंबईत ज्या १७ विविध संस्था आहेत त्यांचं एकत्रीकरण केलं पाहिजे हे योग्य आहे पण ते कठीण आहे. कारण मुंबई ही कोस्टल सिटी आहे आणि आंतरराष्ट्रीय शहर आहे. इतर शहरांच्या तुलनेत इथे संस्था जास्तच असणार आहेत. पर्यावरणाच्या संदर्भातल्याच पाच अथॉरिटीज आहेत तसंच मुंबई आंतरराष्ट्रीय शहर असल्याने केंद्र सरकारच्या दहा अथॉरिटीज आहेत. आपण वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार करत आहोत ते यांना एकत्र आणतात. आपण वॉर रुमचा प्रयोग केला तो काय ते सांगतो. मुंबईतली पहिली मेट्रो यायला ११ वर्षे लागली. त्या ११ वर्षांपैकी ही सहा वर्षे डिझाईन ते टेंडर पर्यंत गेली. त्यापुढे पाच वर्षे बांधकामासाठी गेली. आमच्या जेवढ्या मेट्रो आहेत त्यांना डिझाईन ते टेंडर या प्रक्रियेसाठी ११ महिने लागले. हे का करु शकलो? तर वॉर रुममध्ये ज्या १७ एजन्सीज आहेत त्यांना आपसात एकत्र बसवलं त्याबाबतचे दावे, त्यातले समस्या हे सांगितलं तिथेच एनओसी द्या सांगितलं. त्यामुळे ११ महिन्यांत काम सुरु करु शकलो. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.