राज्याचे विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून कामकाजाचा तिसरा आठवडा सुरु आहे. अर्थमंत्री अजित वापर यांनी मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पवरील चर्चेला आज दुपारी सुरुवात झाली. याबाबतचे पहिले भाषण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाषणात अर्थसंकल्प कसा फसवा आहे या मुद्द्यावरुन फडणवीस राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली. दरम्यान या अर्थसंकल्पात राष्ट्रवादीला झुकते माप मिळाल्याचा मुद्दा मांडत सत्ताधारी पक्षांना खास करुन शिवसेनेना चिमटे काढण्याची संधी फडणवीस यांनी सोडली नाही.

“राज्याचा अर्थसंकल्प हा ५ लाख ४८ हजार ७७७ कोटी रुपयांचा आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना एकुण ३ लाख १४ हजार ८२० कोटी रुपये देण्यात आले आहेत, म्हणजे एकुण अर्थसंकल्पाच्या ५७ टक्के रक्कम ही राष्ट्रवादीला मिळाली आहे. एक लाख ४४ हजार १९३ कोटी रुपये म्हणजे २६ टक्के काँग्रेसला तर फक्त ९० हजार रुपये हे शिनवसेनेकडे असलेल्या खात्यांना मिळाले आहेत, १६ टक्के रकक्म मिळाली आहे”, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला. सर्वात जास्त पगार द्यावा लागतो अशी खाती काँग्रेस आणि शिवसेनेकडे आहेत, तरीही एवढी कमी रक्कम दिली असल्याचा टोला सभागृहात उपस्थित असलेल्या अनिल परब यांना फडणवीस यांनी लगावला.

फडणवीस म्हणाले “अजित दादांना मानलंच पाहिजे डंके की चोट पे काम. मागच्या वेळेस हेच केलं. आताही एकदम ठाम. सगळा पैसा राष्ट्रवादीकडे” असे चिमटे अजित पवारांनाही फडणवीस यांनी काढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे जुन्या योजनांवर लावलेला जुनं लेबल असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. अर्थसंकल्पातली पंचसूत्री योजना म्हणजे जुन्या योजनांचे रिपॅकेजिंग आहे, मांडलेलं बजेट आणि दिसणारे बजेट हे वेगळं आहे. अर्थसंकल्पात पंचसूत्रीमध्ये मांडली आहे पण शेतकऱ्यांना वीज नाही, शेतकऱ्यांना पंचतत्वात विलीन केले जात आहे अशी घणाघती टीका फडणवीस यांनी केली भाषणात केली.