दर आठवड्याला नवनवे चित्रपट प्रदर्शित होत असताना, २७ वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रदर्शित झालेला अभिनेता शाहरुख खान याचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. देशभरात त्याच्या तिकिटांसाठी आगाऊ नोंदणीही सुरू झाली आहे.शाहरुखचा २ नोव्हेंबर रोजी ५७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने येत्या २ नोव्हेंबर रोजी देशभरातील पीव्हीआरच्या अनेक चित्रपटगृहांतून हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सद्यस्थितीला मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, अहमदाबाद, लखनऊ, पुणे आणि सुरतमध्ये या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले असून तिकिटाचे दर १०० ते १५० रुपये इतके आहेत.शाहरुख खान आणि काजोल यांच्या एव्हरग्रीन जोडीचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. २७ वर्षांनंतरही आज या चित्रपटाचे जगभरात लाखो चाहते आहेत.

हेही वाचा >>>मुंबई ते अलिबाग प्रवास आता केवळ ४० मिनिटांत; मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा मंगळवारपासून होणार सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखच्या वाढदिवशी पठाणचा टीझर
शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. पाच वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सिद्धार्थ आनंद यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांना पाहता येईल.