scorecardresearch

डास निर्मूलनासाठी ड्रोनने जंतुनाशक फवारणी

डेंग्यू व हिवतापाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, तसेच डासांची उत्पत्तास्थाने नष्ट करण्यासाठी पालिकेने आता अत्याधुनिक पद्धतीचा वापर सुरू केला आहे. 

डास निर्मूलनासाठी ड्रोनने जंतुनाशक फवारणी
महालक्ष्मी धोबीघाट येथे सोमवारी ड्रोनच्या माध्यमातून जंतूनाशक फवारणी करण्यात आली.

‘जी दक्षिण’ विभागासाठी महापालिकेचा निर्णय

मुंबई : डेंग्यू व हिवतापाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, तसेच डासांची उत्पत्तास्थाने नष्ट करण्यासाठी पालिकेने आता अत्याधुनिक पद्धतीचा वापर सुरू केला आहे.  ड्रोनच्या साहाय्याने घरांच्या व इमारतींच्या छतावर जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. मात्र हा अत्याधुनिक प्रयोग के वळ वरळी, प्रभादेवीचा भाग असलेल्या ‘जी-दक्षिण’ विभागापुरताच मर्यादित आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी महालक्ष्मी धोबीघाट येथे ड्रोनच्या मदतीने औषध फवारणी करण्यात आली.

मुंबईमध्ये पावसाळी आजारांचा ताप वाढला आहे. ऑगस्टमध्ये हिवतापाचे ७९० रुग्ण, तर डेंग्यूचे १३२ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे डांसांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी कीटकनाशक विभागाने कं बर कसली आहे. विविध ठिकाणी जाऊन कर्मचारी शिडीच्या मदतीने डास अंडी घालू शकतात अशा छपरावरील वस्तू काढून टाकत असून तेथे फवारणी करण्यात येत आहे. मात्र वरळी, प्रभादेवीचा, महालक्ष्मीचा भाग असलेल्या जी दक्षिण विभागात ड्रोनच्या साहाय्याने फवारणी के ली जात आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या या विभागासाठी खास ड्रोन तैनात ठेवण्यात आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रभागातील महालक्ष्मी धोबीघाट परिसरात सोमवारी ड्रोनच्या साहाय्याने  फवारणी करण्यात आली.

पालिके च्या जी दक्षिण विभागातर्फे  सीएसआर निधीतून या ड्रोनची खरेदी करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत साडेसात लाख रुपये आहे.  जी /दक्षिण विभागामध्ये मोठय़ा प्रमाणात मोडकळीस आलेल्या गिरण्या, लोअर परेल रेल्वे कार्यशाळेच्या ठिकाणी असणारे रूफ गटर, झोपडपट्टीच्या वरील भागात ठेवण्यात आलेल्या ताडपत्री अशा ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी साचून हिवताप वाहक डांसाची उत्पत्ती होते. या ठिकाणी पाहणी करण्याकरिता व अळीनाशक फवारणी करण्याकरिता कीटकनियंत्रण खात्याच्या कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने जंतुनाशक फवारणी करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या पद्धतीने फवारणी करताना जंतुनाशकाचे थेंब अंगावर पडले तरी त्यात कोणताही धोका नसल्याची माहिती कीटनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

६८९ डास उत्पत्तीस्थाने नष्ट

या ड्रोनची टँक क्षमता दहा लिटर आणि बॅटरीची क्षमता अर्धा तास आहे. एका कंपनीची मदत घेऊन प्रशिक्षित पायलटद्वारे ड्रोन उडवला जात आहे. तसेच याव्यतिरिक्त कीटकनियंत्रण खात्यांच्या कर्मच्याऱ्यांमार्फत विभागामध्ये एकूण ६८९ एवढे हिवतापवाहक डांसांची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यात आली.

मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहावे हा आमचा प्रयत्न असून प्रत्येक विभाग कार्यालयाला एक ड्रोन देण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. कमी पैशात जास्त परिणामकारकता यातून साध्य होत असल्यामुळे मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या निश्चितच कमी होण्यास हातभार लागेल.

किशोरी पेडणेकर, महापौर

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drone spraying for mosquito eradication ssh