गणेश विसर्जनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आलेले दिसले. त्यांनी वरळीतील गणपती मंडळांना भेट देत गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मागील काळात जी नकारात्मकात पसरली होती ती घालवण्यासाठी धुमधडाक्यात गणेशोत्सव करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईसह महाराष्ट्रात गणरायाचं आगमन अतिशय जल्लोषात, धुमधडाक्यात झालं. सरकारने सर्व निर्बंध हटवून टाकले. बिनधास्त, धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करा, असं आवाहन सरकारनं केलं. मी १० दिवस पाहतोय की लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मागील काळात जी नकारात्मकता पसरली होती, ती घालवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.”

“पोलीस सण-उत्सव, उन, पाऊस, वारा कशाचाही विचार न करता कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहणं आपली जबाबदारी, कर्तव्य आहे, असं मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाटलं. त्यामुळे आम्ही पोलिसांच्या घरांचा निर्णय घेतला. सर्वांनीच या निर्णयाचं स्वागत केलं,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

हेही वाचा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पोलिसांच्या घरांसाठी जीआर काढला आहे. करारनामाही लवकरच करू. आम्ही त्यासाठी वरळीत पुन्हा येऊ,” असंही आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं.