मुंबईत १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील वृद्ध आरोपी दाऊद फणसे (८८) याचा जे. जे. रुग्णालयात गुरुवारी मृत्यू झाला. आरोपी दाऊद फणसे याला ‘टाडा’ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शुक्रवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.