मुंबई : निवडणूक रोखे खरेदीदारांच्या यादीत नाव असलेल्या हैदराबादस्थित ‘मेघा इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड’ या कंपनीला गेल्या दोन वर्षांत मुंबई महापालिकेत दोन मोठी कंत्राटे मिळाली आहेत. पश्चिम उपनगरातील एका रस्त्याच्या कंत्राटासह वर्सोवा ते दहिसर या प्रकल्पातील दोन टप्प्यांची कोटयवधी रुपयांची कामे याच कंपनीला देण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> पंतप्रधानांच्या सभेचे आधी काम, नंतर निविदा सूचना! २०.५५ कोटींची कामे; बांधकाम विभागाचा कारभार

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

मुंबईतील रस्ते दोन वर्षांत खड्डेमुक्त करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेने ऑगस्ट २०२२ मध्ये सहा हजार कोटींच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील कामांसाठी पाच निविदा मागविण्यात आल्या. यातून पाच कंत्राटदारांची निवड करण्यात आल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये या कामांचे कार्यादेश देण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले. यातील पश्चिम उपनगरातील परिमंडळ चारमधील १,६३१ कोटी रुपयांची कामे मेघा इंजिनीअरिंगला देण्यात आली होती.

रस्त्याचे काम रखडल्यामुळे कंपनीला साडेतीन कोटींचा दंडही करण्यात आला होता. कंपनीला मिळालेले दुसरे कंत्राट दहिसर वर्सोवा मार्गातील कामाचे आहे. एकूण १८.४७ किमीच्या या मार्गाचा मूळ खर्च १६ हजार कोटी आहे. याच्या सहा टप्प्यांपैकी चारकोप ते माईंडस्पेस मालाडपर्यंत समांतर बोगद्यांचे काम मेघा इंजिनीअरिंगला देण्यात आले आहे. यातील एका टप्प्याचा खर्च सुमारे अडीच हजार कोटी असून दोन्ही दिशांचे बोगदे मिळून सुमारे पाच हजार कोटींचे हे कंत्राट आहे.