अंधेरी येथील आंबोली नाक्यावरील एका बंद गोदामाला शनिवारी सायंकाळी आग लागली होती. रंगाचे गोदाम असल्याने ही आग क्षणातच भडकली. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या आगीत कोणीही मृत वा जखमी झाले नाही.
अंधेरी येथील आंबोली नाक्यावरील चर्चसमोरील साई सदनमधील बैठय़ा गोदामाला शनिवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब आणि पाण्याचे चार टँकर तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. हे गोदाम बंद असल्यामुळे कोणीही मृत वा जखमी झाले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2015 रोजी प्रकाशित
अंधेरी येथील आगीत रंगाचे गोदाम खाक
अंधेरी येथील आंबोली नाक्यावरील एका बंद गोदामाला शनिवारी सायंकाळी आग लागली होती.
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 13-12-2015 at 01:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at warehouse