मुंबई – आज पहाटे गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील हाथी गेटजवळील अन्नपूर्णा सेटवर आग लागल्याची घटना घडली. ही आग मराठी बिग बॉस सेटच्या मागील भागात असलेल्या तंबूमध्ये लागली.
चित्रनगरीतील अन्नपूर्णा सेटवर पहाटे ६ वाजता आग लागली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने ही आग लेव्हल-१ ची जाहीर केली. घटनेच्या ठिकाणी ४ अग्निशमन गाड्या, ४ जम्बो टँकर, १ अॅडिशनल डिव्हिजनल फायर ऑफिसर आणि ३ स्टेशन अधिकारी तात्काळ दाखल झाले. या आगीत कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, अधिक तपास सुरू आहे.