या आठवड्यात अंमलबजावणी

मुंबई: उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलकडे सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणी प्रवाशांचाही ओढा आहे. हे प्रवासी वातानुकूलित लोकलकडे वळावेत यासाठी सामान्य लोकलचा प्रथम श्रेणी पास आणि वातानुकूलित लोकल पासातील फरक भरून प्रवाशांना नवीन पास मिळणार आहे. या आठवड्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : विमानतळ बस सेवेचे आगाऊ तिकीट काढता येणार; बेस्ट उपक्रमाची उद्यापासून नवी सेवा

डिसेंबर २०१७ मध्ये वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल झाली. त्यानंतर मध्य रेल्वेवरही वातानुकूलित लोकल सेवेत आली. वातानुकूलित लोकलकडे आकर्षित झालेले बहुतांश प्रवासी हे सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचेच प्रवासी अधिक असल्याचेही रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सामान्य लोकलच्या अधिकाधिक प्रथम पासधारकांना आकर्षित करण्यासाठी वातानुकूलित लोकल पास रूपांतरीत करता येणार आहे.

हेही वाचा : विसर्जनसाठी २० हजार पोलिसांचा बंदोबस्त

पासदरातील फरक भरून पास उपलब्ध होणार आहे. तशी मंजुरीहीरेल्वे बोर्डाने दिली आहे. सध्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मशन सिस्टिम (क्रिस)कडून चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होताच मध्य आणि पश्चिम रेल्वेवर याची अंमलबजावणी होणार आहे. या आठवड्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले. पासदरातील फरक भरून नवीन पास तिकीट खिडक्या वर मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्या प्रवाशाने प्रथम श्रेणीचा पास जेवढे दिवस वापरला असेल आणि ऊर्वरित दिवसांसाठी तो वातानुकूलित लोकलच्या पासमध्ये रुपांतरित करायचा असेल तर तशी सुविधा उपलब्ध नाही. त्यासाठी संपूर्ण महिन्याभराचाच पास काढावा लागत आहे. सध्या मध्य रेल्वेवर ५६ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत असून दररोज ४९ हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. मध्य रेल्वेवर जानेवारी २०२२ मध्ये हीच दररोज प्रवासी संख्या १ हजार १९४२ होती. तर पश्चिम रेल्वेवर दररोज ४८ लोकल फेऱ्या होत असून चांगला प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे.