मुंबई : अधिकाधिक रुग्णांना मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे क्राऊड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून निधी गोळा करण्यात येणार आहे. दुर्धर आणि गंभीर आजार असलेल्या आणि उपचारासाठी १० लाख रुपयांहून अधिक खर्च येणाऱ्या रुग्णांसाठी क्राऊड फंडिंग करण्यात येणार आहे. यासाठी कक्षामार्फत स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार’ आणि ‘क्राउड फंडिंग’ या दोन आर्थिक मदतीच्या संकल्पनेमुळे कॉर्पोरेट कंपन्या, दाते आणि रुग्णालये यांचे सहकार्य रूग्णांना मिळणार असून, हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रूग्णांसाठी क्राउड फंडिंग सुरू करण्यात येत आहे. उपचाराचा खर्च १० लाख रुपयांहून अधिक असलेले, दुर्धर आणि गंभीर आजार झालेले रुग्ण क्राउड फंडिंगसाठी पात्र ठरणार आहेत. कक्षातर्फे बनविण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टलवर या अशा रूग्णांनी अर्ज सादर करावा. तीन महिन्यांच्या कालावधीत हे पोर्टल कार्यरत होणार आहे. रूग्णांच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार असेल, त्यावेळी सर्व योजनांचा फायदा घेऊनही निधीची कमतरता भासते, त्यावेळी क्राउड फंडिंग महत्त्वाचे ठरणार आहे. रूग्णांच्या पात्रतेची तपासणी आणि पारदर्शक प्रक्रियेसाठी नियामक यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे. ही सुविधा ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू रुग्णांसाठी वरदान ठरेल.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कॉर्पोरेट कंपन्या, दाते, एनजीओ आणि रुग्णालय मिळून रुग्णांच्या उपचारासाठी मदत करणार आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत क्राउड फंडिंग सुरू केले जाणार आहे. राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा लाभ देता यावा यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून लवकरच त्रिपक्षीय करार करण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, कार्पोरेट कंपनी, रूग्णालय आणि त्यासोबत काही प्रमाणात रूग्णांचेही योगदान अपेक्षित असणार आहे.

आता परदेशातून निधी स्वीकारता येणार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला परदेशातून निधी स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेली एफसीआरए (फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्यूलेशन ॲक्ट) मान्यता नुकतीच प्राप्त झाली आहे. यामुळे परदेशातील दानशूर व्यक्ती, संस्था, सीएसआर कंपन्यांकडून थेट आर्थिक मदत स्वीकारता येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हे एफसीआरए प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. या परदेशी निधीचा वापर गरजू रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रूग्णांनी अर्ज केल्यानंतर उर्वरित जबाबदारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून पार पाडण्यात येणार आहे. रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना ही योजना प्रत्यक्षात आकाराला येत आहे. रामेश्वर नाईक, मदत कक्ष प्रमुख,मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय