मुंबई : वादग्रस्त २ जी घोटाळ्यातून तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव अहवालातून वगळावे म्हणून संजय निरुपम यांनी दबाव आणला होता या भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) विनोद राय यांच्या दाव्याबाबत निरुपम यांनी गुदरलेल्या बदनामीच्या खटल्यात राय यांनी गुरुवारी न्यायालयात लेखी दिलगिरी व्यक्त केली.

२ जी घोटाळ्यात १ लाख ७६ हजार कोटींचा नुकसान झाल्याच्या राय यांच्या अहवालावरून देशातील वातावरण बदलले होते. संसदेत लोकलेखा समितीच्या बैठकीनंतर निरुपम यांच्यासह काँग्रेसच्या तीन खासदारांनी आपल्याला भेटून या घोटाळ्याच्या अहवालात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव वगळावे यासाठी दबाव आणल्याचा आरोप राय यांनी वृत्तवाहिन्यांवर के ला होता. त्यावर आपण कधीच राय यांना भेटलो नसल्याचे स्पष्टीकरण निरुपम यांनी के ले होते. राय यांनी आपले विधान मागे घेण्यास नकार दिल्याने निरुपम यांनी नवी दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात बदनामीचा खटला भरला होता. निरुपम यांनी दबाव आणल्याचा कोणताही पुरावा राय सादर करू शकले नव्हते.  आपण तसे विधान के ले असावे, असा मजकू र माफीपत्रात राय यांनी सादर के ला होता. त्याला निरुपम यांनी आक्षेप घेतला. अखेर राय यांनी माफीनाम्याचे नवे पत्र गुरुवारी न्यायालयात सादर के ले. २ जी घोटाळा आणि कोळसा खाणींच्या वाटपांच्या संदर्भातही राय यांनी चुकीचे अहवाल सादर के ले होते. त्याबद्दल राय यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी निरुपम यांनी के ली आहे. शेवटी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रि याही राय यांच्या माफीबद्दल व्यक्त के ली.