परिसरात पाणी येत नसल्याने वर्षभरापूर्वी घाटकोपरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी एका पालिका अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली होती. याबाबत विनोबा भावे नगर पोलिसानी सोमवारी लांडगे यांना अटक केली असून, अटकेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केले होते.

हेही वाचा – ‘गोल्डन गँग’ म्हणणाऱ्या शिवसेनेला आशिष शेलारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमची दाऊद गँग…”

हेही वाचा – मुंबई : घरांच्या प्रश्नी १२ मार्चला गिरणी कामगार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर धडकणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटकोपर असल्फा परिसरात वर्षभरापूर्वी मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या होती. नागरिकांनी ही समस्या स्थानिक माजी नगरसेवक किरण लांडगे यांच्या कानावर घातली. त्यांनी तात्काळ पालिका अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी लांडगे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. पालिका अधिकाऱ्याने याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वर्षभरानंतर न्यायालयाच्या आदेशाने विनोबा भावे नगर पोलिसांनी सोमवारी लांडगे यांना अटक केली. मात्र, त्यांच्या अटकेची माहिती मिळताच नागरिकांनी घाटकोपर परिसरात रास्तारोको केले. त्यानंतर नागरिकांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येऊन निदर्शने केली. शिंदे गटाच्या दबावामुळे लांडगे यांच्यावर ही कारवाई झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.