Pradeep Sharma : एक काळ असा होता की मुंबईत दाऊदचे फोटो असलेले ब्रेसलेट, चेन वगैरे लोक घालायचे. दाऊदची प्रचंड दहशत मुंबईत होती. मला त्या काळात धमक्याही आल्या होत्या १९९३ पासून मला सुरक्षा पुरवण्यात आली आहे अशी माहिती माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी सांगितलं. प्रदीप शर्मा यांनी दाऊदच्या भावाला घरात घुसून कशी अटक केली होती ती घटना सांगितली.
सादिक कालियाबाबत काय म्हणाले प्रदीप शर्मा?
प्रदीप शर्मा म्हणाले, “दाऊदचा सर्वात प्रमुख शूटर सादिक कालिया होता. तो २२ टोळीयुद्धातील हत्यांमध्ये सहभागी होता आणि पोलिसांना हवा होता. आम्ही त्याचा शोध घेत होतो. एके दिवशी आम्हाला माहिती मिळाली की तो आणि त्याचे सहकारी संध्याकाळी ५ वाजता दादर भाजी मार्केटमधील कोहिनूर इन्स्टिट्यूटसमोर येणार आहेत. मी आणि माझी टीम तिथे गेलो. आम्ही त्याला ओळखले नाही आणि त्याचा फोटोही आमच्याकडे नव्हता. माहिती अशी होती की तो त्या दिवशी तत्कालीन खासदार मोहन रावले यांना मारणार होता. दाऊदने त्या रात्री शिवसेना खासदारांना मारण्याचे निर्देश दिले होते. आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांनी आम्हाला पाहून गोळीबार केला. प्रत्युत्तरात तो जखमी झाला आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.”
इकबाल कासकरला कशी अटक केली?
दाऊदचा भाऊ इकबाल कासकर दुबईला होता. त्यानंतर तो डिपोर्ट झाला. त्याला आम्ही अटक केली. माझी ठाण्याला पोस्टिंग झाली. मला कळलं की इकबाल कासकर रॅकेट चालवतो आहे. खंडणी, बिल्डर्सना धमकावणं वगैरे प्रकार सुरु होते. नागपाडा भागात शक्यतो कुणी पोलीस जात नाहीत. त्याच्या घराखाली पोलीस आले तर लगेच सांगणारे त्याला कळवणारे लोक बसून असायचे. मी आठ ते दहा दिवस मी खासगी लोक बसवले होते. एके दिवशी मी थेट त्याच्या घरी गेलो. त्याच्या एका माणसालच बरोबर घेतलं होतं. की होल मधून त्याने पाहिलं आपलाच माणूस आहे त्यामुळे त्याने दरवाजा उघडला. आत गेलो तर इकबाल बिर्याणी खात होता. मी त्याला म्हटलं इकबाल चलो. त्यावर तो म्हणाला साहब बिर्याणी खाने दो. त्यावेळी त्याला बिर्याणी खाऊ दिली आणि अटक करुन घेऊन आलो. त्याने पळायचा वगैरे प्रयत्न केला नाही असं प्रदीप शर्मांनी सांगितलं. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती प्रदीप शर्मांनी दिली. आम्ही एन्काऊंटर करणारे म्हणून इतके प्रसिद्ध होतो की मला कुठल्या गुन्हेगाराला मारायची गरजच पडली नाही. बोल रहा की आगे कुछ सोचे? असं विचारलं की सगळं सांगायचे अशीही आठवण प्रदीप शर्मांनी सांगितली.