मुंबईः खार परिसरातील एका व्यक्तीला बेकायदेशिररित्या ताब्यात घेतल्याच्या आरोपाखाली चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणात यापैकी एकाने या व्यक्तीच्या खिशात अमली पदार्थ ठेवल्याचे निदर्शनास आले. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

खार परिसरात ३० ऑगस्ट रोजी ही घटना घडली. गोठ्यात काम करणाऱ्या डॅनियलला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून खार पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या खिशात २० ग्रॅम मेफेड्रोन सापडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले असता पोलीस असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती डॅनियलच्या खिशात काही तरी ठेवत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने डॅनियलला सोडले. तसेच त्याला केवळ संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते, असे सांगणयात आले.

हेही वाचा – राज्यातील ‘आयटीआय’मध्ये आत्मसंरक्षणाचा वर्ग भरणार, राज्यातील महिलांसाठी ‘हर घर दुर्गा अभियान’

हेही वाचा – गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचा खर्च अडीचशे कोटींनी वाढला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे चित्रीकरण समाजमाध्यमांवर वायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॅनियला ताब्यात घेणारे दोघे व त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली. ते चौघेही खार पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणाची चौकशी केली असता चौघांनीही प्रचलित कायदेशिर पद्धतीचा अवलंब न करता डॅनियलला ताब्यात घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच अंगझडती घेताना त्यांच्या हालचाली संंशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. अखेर त्या पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पुढील चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याचे उपायुक्त (परिमंडळ-९) राजतिलक रौशन यांनी सांगितले.