बदलापूर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी निविदेची बोगस जाहिरात दिल्याप्रकरणी दोन माजी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक आदी १८ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळुमामा सूर्यवंशी यांनी केलेल्या तक्रारीनुसार तत्कालिन मुख्याधिकारी सुदाम धुपे, सहाय्यक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर, अभियंता संजय हिंगमीरे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राम पातकर, राजेंद्र घोरपडे, विद्यमान नगरसेविका मेधा गुरव, माजी नगरसेवक मिलिंद नार्वेकर, सदानंद मेहेर, मनोज वैद्य, प्रसाद फाटक, संभाजी शिंदे, शिरीष मुंढे, वास्तुरचनाकार, क्षीखंडे कन्सलटन्सी तसेच कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर, शालिनी अॅडव्र्हटायझिंगचे प्रतिनिधी तसेच पालिका कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्त्वानुसार बांधण्यात येणाऱ्या पालिकेच्या प्रशासकीय इमारतीची निविदा बोगस रितीने प्रसिद्ध करण्यात आली. त्यासाठी संबंधित वृत्तपत्राचे जाहिरातीचे बनावट पान छापून घेण्यात आले, अशी तक्रार आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2013 रोजी प्रकाशित
पालिका इमारतीच्या बोगस निविदाप्रकरणी १८ जणांविरोधात गुन्हा
बदलापूर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी निविदेची बोगस जाहिरात दिल्याप्रकरणी दोन माजी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक आदी १८ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 04-04-2013 at 03:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud in tender for corporation building