Premium

मुंबई : वाढदिवसाच्या पार्टीनंतर डीजेच्या पैशांवरून मित्राची हत्या

वाढदिवस साजरा केल्यानंतर डिजेचे पैसे देण्यावरून झालेल्या वादात चौघांनी मित्राला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली.

Mumbai Murder
मुंबईत तरुणाची हत्या

मुंबई : वाढदिवस साजरा केल्यानंतर डिजेचे पैसे देण्यावरून झालेल्या वादात चौघांनी मित्राला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक केली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात राहणारा साबीर अन्सारी (१८) याचा गुरुवारी वाढदिवस होता. त्यामुळे त्याने मित्रांना परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टी दिली. त्यानंतर मित्रांनी साबीरचा वाढदिवस अधिक जोरात साजरा करण्यासाठी परिसरात डीजेचे आयोजन केले. रात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर साबीरने मित्रांना डीजेचे पैसे देण्याची विनंती केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी साबीरला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. शिवाजी नगर पोलिसांनी याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करून जब्बार मिर्जा (१८) याच्यासह एका १७ वर्षांच्य मुलाला अटक केली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Friend killed after birthday party over djs money mumbai print news ysh

Next Story
मुंबई : एमएमआरसी पावसाळ्यासाठी सज्ज