Railway Ganpati Festival Ticket Booking: लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे.  यंदा गणपतीचे आगमन १९ सप्टेंबर २०२३ ला होणार आहे.  गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी आधीचे रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण अर्थात बुकिंग येत्या १६ मेपासून रेल्वेचे बुकिंग सुरू होणार आहे.

कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या बुकिंगचे वेळापत्रक पाहा

मंगळवार १६ मे २०२३ रोजी बुधवार १३ सप्टेंबर २०२३ च्या गाडीचे बुकिंग होईल.

बुधवार १७ मे २०२३ रोजी गुरुवार १४ सप्टेंबर २०२३ रोजी पाच दिवस आधीचे बुकिंग होईल.

गुरुवार १८ मे २०२३ रोजी शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी चार दिवस आधीचे बुकिंग होईल.

शुक्रवार १९ मे २०२३ रोजी शनिवार १६ सप्टेंबर २०२३ रोजी तीन दिवस आधीचे बुकिंग होईल.

शनिवार २० मे २०२३ रोजी रविवार १७ सप्टेंबर २०२३ रोजी दोन दिवस आधीचे बुकिंग होईल.

रविवार २१ मे २०२३ – १८ सप्टेंबर २०२३ (हरितालिका तृतीया)

सोमवार २२ मे २०२३ – १९ सप्टेंबर २०२३ (श्रीगणेश चतुर्थी)

मंगळवार २३ मे २०२३ – २० सप्टेंबर २०२३ (ऋषिपंचमी)

बुधवार २४ मे २०२३ – २१ सप्टेंबर २०२३ (गौरी आगमन)

गुरुवार २५ मे २०२३ – २२ सप्टेंबर २०२३ (गौरी पूजन)

शुक्रवार २६ मे २०२३ – सप्टेंबर २०२३ (गौरी विसर्जन)

(हे ही वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ जागेवर चहूबाजूंनी येते रेल्वे, देशातील एकमेव ठिकाणाचं नाव ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेकडून कोकण विभागासाठी विशेष गाड्या 

सुट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविंम (गोवा) दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. अतिरिक्त रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.