यंदाही गणेशोत्सवावर करोनाचं संकट असून यादरम्यान मुंबईतील गणेशभक्तांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईतील गणेशभक्तांना लालबागमधील सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहता येणार नाहीत. लालबागमधील सर्व गणेश मंडळांची मुंबई पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान लालबागमधील गणपतींचं ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे. एबीपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहीडंहीप्रमाणे गनिमी काव्याने गणेशोत्सव?; राज ठाकरे म्हणाले…

करोना स्थिती आटोक्यात आली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात करोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे. दरम्यान मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी लालबागमध्ये सर्वात जास्त गर्दी होत असते. लालबागमध्ये गणेशगल्ली, लालबागचा राजा, रंगारी बदक, चिंचपोकळीचा चिंतामणी अशी अनेक गणेशमंडळं असून तिथे असणाऱ्या उंच मूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्त नेहमी गर्दी करत असतात. यावेळी या मूर्ती चार फुटांच्या असणार आहेत.

गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीचे शुल्क माफ
निमित्त : गणपतीची मूर्ती कशी असावी?

मूर्तीची उंची कमी असली लालबागमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोणत्याही मंडळाचं दर्शन बाहेरुन येणाऱ्या गणेशभक्तांना घेता येणार नाही. मात्र तेथील रहिवासी, स्थानिकांना हे दर्शन घेता येणार आहे. मंडळांकडून गणेशभक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलीस आणि सार्वजनिक मंडळांमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी गणेश मंडळांना तसे आदेश देण्यात आले.

सरकार कोणत्याही सणांविरोधात नव्हे तर करोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री

“महाविकास आघाडी सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर करोनाच्या विरोधात आहे. केंद्रातील मोदी सरकारनेच सणांच्या काळात संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करत काळजी घेण्यास व गर्दी रोखण्यासाठी आवश्यक निर्बंध घालण्यास राज्य सरकारला सांगितले आहे,” याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवलं होतं.

“करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी अशी सूचना राज्याला पत्र पाठवून केली आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे. आपल्या बेशिस्त वागणुकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन ही अडचणीत आणत आहेत,” असंही ठाकरे यांनी सुनावलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav lalbaug ganesh mandal to give online darshan sgy
First published on: 06-09-2021 at 13:28 IST