मुंबई: जर्मनीची ट्रम्प कंपनी विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स निर्मितीसंदर्भातील प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात ३०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीला राज्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून त्यांना उद्योग उभारणीसाठी सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्यात गुंतवणूकवाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी उद्योगमंत्री सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूकवाढीबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनीने पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीच्या उत्पादन निर्मिती केंद्राला भेट दिली. त्यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड बॅनम्युलर आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप पाटील यांनी सामंत यांचे स्वागत केले.

uday samant buldhana marathi news
“महायुती बुलढाण्यासह राज्यात ४५ जागा जिंकणार”, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा; तुपकरांवर टीकास्त्र
Why Buy Most BH Series Vehicle Number in Pune Who can get this number
विश्लेषण : सर्वाधिक BH मालिका वाहन क्रमांकाची खरेदी पुण्यात का? हा क्रमांक कुणाला मिळू शकतो?
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

बॅनम्युलर यांनी कंपनीच्या अत्याधुनिक लेझर कटिंग मशिन्स आणि फोल्डिंग मशिन्सचे सादरीकरण केले. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या  बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स तयार करण्यासाठी या मशिन्स वापरल्या जात आहेत. या मशिन्ससाठी ट्रम्फ कंपनी महाराष्ट्रात निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास उत्सुकता दाखविली. त्यावर या प्रकल्पासाठी सरकार पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन सामंत यांनी दिले. कंपनीचे प्रतिनिधी पुढील महिन्यात महाराष्ट्राला भेट देऊन स्थळपाहणी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.          

सामंत यांनी यावेळी स्टुटगार्ट येथील लॅप काबेल समूहालाही भेट दिली. यावेळी बार्डनचे संचालक आणि भारताचे वाणिज्य दूत अँड्रियास लॅप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लॅप यांनी विद्यूत वाहन चार्जिग केबल्समधील नवीन तंत्रज्ञान आणि पोर्टेबल ईव्ही अडॅप्टरचे सादरीकरण केले. समृद्धी महामार्गावर या तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. उच्च दर्जाच्या तांब्याच्या धातूसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला भेट देण्याचे कंपनीला निमंत्रण देण्यात आले.