गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं ‘भावी मुख्यमंत्र्यां’चे बॅनर्स झळकत आहेत. यावरून राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच मनसेचे नेते बाळा नांदगावर यांनी एक विधान केलं आहे. आमच्या पक्षाला सत्ता दिली, तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिना’निमित्त मनसेच्या वतीने कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा, ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनरबाजी आणि मध्यावधी निवडणुकीबद्दल प्रश्न विचारल्यावर बाळा नांदगावर यांनी सांगितलं, “मध्यावधीची कोणतीही शक्यता वाटत नाही. बॅनरबाजी करणं हा ज्यांच्या त्यांच्या पक्षांचा विचार आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण, आमच्या पक्षाला सत्ता दिली, तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील.”

हेही वाचा : “कोण नितेश राणे? त्याला अक्कल आहे का?”, ठाकरे गटाच्या नेत्याने फटकारलं, म्हणाले…

“सध्या राजकारणात कोण कोणाला ‘काडतूस’, ‘फडतूस’ बोलतो. कधी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यात, तर कधी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्यात कुस्ती चालू होते. संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यातही कुस्ती चालू आहे. सगळ्या कुस्त्या पाहता महाराष्ट्रात नक्की काय चालूयं हेच कळत नाही. त्यामुळे राज ठाकरे कुस्तीच्या फडात उतरतात का? हे ६ मे ला कळेल,” असं बाळा नांदगावकरांनी म्हटलं.

राज ठाकरे कुस्तीच्या मैदानात सोडवण्यासाठी उतरणार का? लढण्यासाठी? असा प्रश्न विचारल्यावर बाळा नांदगावर म्हणाले, “ते स्वत: कुस्तीसाठी उतरणार आहेत.”

हेही वाचा : “पालकमंत्री घटनाबाह्य, त्यांचं भाषण…”, चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुमरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लवकरच आपण सत्तेत असू”

“आपल्या कामगार सेनेचा आणि पक्षाचा अभिमान आहे. कधीकधी ५० टक्के तर कधी काहीच काम होत नाहीत. पण, लवकरच आपण सत्तेत असू. त्यामुळे १०० टक्के काम होतील,” असं विधान मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.