‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डीएन नगर) मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते अंधेरी ) गोरेगाव ते गुंदवली या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दुसऱ्या टप्प्यासाठीचे मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून १९ जानेवारीला मेट्रोचा दुसरा टप्पा सेवेत दाखल होणार आहे. मुंबईकरांसाठी नवी वर्षात ही पहिली मोठी भेट ठरणार आहे.

हेही वाचा- मुंबई अग्निशमन दलात ९१० जागांसाठी आजपासून भरती; दहिसरच्या भावदेवी मैदानात होणार थेट भरती

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने लोकार्पणाबाबत काहीशी साशंकता होती. अखेर गुरुवारी सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यश आले आहे. मेट्रो कार्यान्वित करण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक होते. आवश्यक त्या चाचण्या घेऊन मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.

हेही वाचा- पुन्हा एकदा ‘आयएनएस विक्रांत’चे दर्शन घडणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतिकृतीचे उद्धाटन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता हे प्रमाणपत्र मिळाल्याने मेट्रोचा दुसरा टप्पा पुढील आठवड्यापासून सेवेत दाखल होणार आहे. या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी एमएमआरडीएकडून सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गुंदवली मेट्रो स्थानकाला भेट देऊन दुसऱ्या टप्प्याचा आढावा घेतला.